तुझ्या मैत्रीवर कितीही लिहीलं
तरी उनं वाटतं
सारं आहे माझ्याकडे आज
तरी कुठंतरी काहीतरी सुनं वाटतं
तुझ्या मैत्रीचे क्षण
पुन्हा हवेहवेसे वाटु लागतात
आज मन माझं लख्ख आकाश
त्यात तुझ्या आठवांचे ढग दाटु लागतात
तुझ्या मैत्रीची गर्द सावली
अशी आयुष्यावर दाटली होती
आयुष्यातली उन्हं माझ्या
तुझ्याचमुळे आटली होती
तुझ्या मैत्रीच्या आठवणी
मी आजही जपुन ठेवतो
आनंदाचे ते क्षण हरवु नयेत म्हणुन
काळजाच्या तिजोरीत लपुन ठेवतो
मैत्रीचं नातं तुझ्या
माझ्याशी आजन्म असचं राहील
तुला ठेच लागली कधी
तर पापणी माझी वाहील
मन माझे वेडे
पुन्हा एकदा त्या क्षणांचा शोध घेतात
अन शब्द माझे कवितेतुन
तुझ्या मैत्रीचा वेध घेतात
Sunday, September 12, 2010
Sunday, August 8, 2010
Saturday, July 31, 2010
मैत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
आला मैत्रदिन लेवून इंद्रधनु सप्तरंगी
प्रतीकाचे फ्रेंडशिप बँड बांधू मनगटी
मैत्र दिन जरी असे एक दिवसाचा
ख-या मैत्रीचा उत्सव जीवनभराचा
गुलाब अन गिफ्टस होतील जुने
पण मैत्री भरेल जीवनी श्वास नवे
तेवो असंख्य मैत्रदीप वाटेवर तुझ्या
ह्या तुला मैत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
------------------------------------
Subscribe to:
Posts (Atom)