Friday, July 11, 2008

मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी,

मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी,
मैत्रीच्या खुणा आठवणीत बांधणारी..
मनांच्या भिंतींना मैत्रीचे दार पाडून,
एक प्रेमळ मैत्रीसाठी आर्त हाक देणारी...

कधी शिकवण कधी आठवण,
तहानलेल्या चातकाला जशी पावसाची वणवण...
आपल्या मैत्रीचे दिवस पंखाखाली घेत,
प्रेमाचे मृगजळ शोधतेयं माझे हे जीवन..
तरीही या जीवनात सुखाचा आसमंत फुलवनारी,
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी.........


माझ्या या आयुष्यात तुझ्या मैत्रीचा सहारा,
मैत्रीच्या नात्याला तुझ्या आठवणींचा दुजोरा..
दुःखाच्या चिंब पावसात शोधते ,
सुखाची उब देणारा तुझ्या मैत्रीचा निवारा...
सकाळच्या सुर्यासोबत इंद्रधनू घेऊन येणारी....
मैत्री असावी एक वेगळं आयुष्य घडवणारी.......

आयुष्यभर क्षणाक्षणाची संगत म्हणजे मैत्री

आयुष्यभर क्षणाक्षणाची संगत म्हणजे मैत्री
सुखदुःखात एकत्र भिजलेली नाती म्हणजे मैत्री
ठेचकाळून पडताना सावरणारा हात म्हणजे मैत्री
पहिल्या पावसात ओल्या मातीचा सुगंध मैत्री
रणरणत्या उन्हात फुलणारा गुलमोहर मैत्री
अव्यक्त भावनांना मूर्त रुप देणे म्हणजे मैत्री
शेवटच्या प्रवासात रेंगाळणाऱ्या आठवणी म्हणजे मैत्री
जन्मांतरीच्या साथीचे आश्वासन म्हणजे मैत्री
निखळ, निरलस, निरपेक्ष, निराकार मैत्री
आदि पासून अंतापर्यंत शब्दनिर्बन्ध अशी .... फक्त मैत्री ... फक्त मैत्री ..

प्रेम मागुन मिळत नाही

प्रेम मागुन मिळत नाही
प्रेम वाटावं लागतं
ध्यानी मनी नसताना
अवचित भेटावं लागतं

माझ्यावर प्रेम करा
असं म्हणता येत नाही
करु म्हटल्याने
असं काही होत नाही

त्यासाठी जुळावे लागतात
उभयंताचे धागे
भीड आणि भीती मग
आपोआप पडते मागे

प्रेमाचे फुलपाखरु
स्वच्छंद उडतं
मनमोही रंगानी
पुरतं वेडे करतं

पण त्यामागे धावलं तर
आणखी पुढे पळतं,
डोळे मिटुन शांत बसलं
की हळुच खांध्यावर बसतं !!

्ह्दयात कुणाच्यातरी नेहमीसाठी बसावं....,

्ह्दयात कुणाच्यातरी नेहमीसाठी बसावं....,
बसून ह्दयात मग शांतपणे रहावं....!
हक्काने कुणावरतरी कधीतरी रुसावं.....,
मग त्याच्याच समजूतीने क्शनभर विसावं....!


वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!

वाटत कधी-कधी खूप मूसमूसुन रडावं......,
ह्ळूच येवून त्याने मग अश्रू अलगद पुसावं.....!
वाटत कधी-कधी कुणाचतरी होउन पाहावं.....,
कुणाच्यातरी प्रेमात आपणही न्हाउन निघावं....!.


वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!

वाटत कधी-कधी आपणही स्वप्न बघावं.....,
क्शनभर का होइना स्वतःला विसरुन बघावं......!
वाटत कधी-कधी आपणही लिहून बघावं.....,
लिहीता-लिहीता का होइना आपणही प्रेमात पडावं.....!!


वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!

असाव कुणीतरी......

असाव कुणीतरी......
आपल्या हाकेला 'ओ' देणार.....
रिमझिंत्या पावसात हळूच छत्रीत बोलावनार..

असाव कुणीतरी......
आपल्या सोबत चालणार..
चांदण्यात फिरताना हातात हात घेणार..

असाव कुणीतरी......
कधी वाद घालणार..
खोटा रुसवा आणून, पुन्हा आपल्यावरच रागवणार..

असाव कुणीतरी......
मनमोकळ बोलणार..
काहीही न सांगता, अगदी मनातल ओळखणार..

असाव कुणीतरी......
खूप काही विचारणार..
लहान लहान गोष्टीसाठी शपथ घालणार..
असाव कुणीतरी...................

मैत्री कशी असावी?

मैत्री कशी असावी?
जी कधीही पुसली न जावी
जशी रेघ काल्या दगडावरची
कोणतही वातावरण पेलवनारी
एखाद्या लवचिक वेलीसारखी......

कुठेही दडली तरी अस्तित्व दाखवणारी
कुठेही चमकणार्‍या हिर्‍यासारखी
थोड्याश्यावर न भागणारी
दुष्काळात तहाननेल्या मनसासारखी.......

पवित्रतेने परिपूर्ण अशी
देववरचि फ़ुले जशि.....

कधीही न सम्पणारी
विशाल सागरासारखी
सतत बरोबर असावी
शरीराच्या प्रत्येक अवयवासारखी....

तुटली तरि कायम आठवणीत असणार्‍या
आयुष्यातल्या सोनेरी क्षणासारखी...........

मैत्री अशी असावी
प्रत्येक तासाला, क्षणात बदलणारी
मनाला तजेला देणारी
कधीही न मरणारी
अमर झालेल्या जिवासारखी

शब्दही न बोलता

शब्दही न बोलता
अबोल साथ करते,
ती मैत्री.

गवगवा न करता
एकलेपण मिटवते,
ती मैत्री.

खूप व्याप्‍त असतानाही
आवर्जून आठवण काढते,
ती मैत्री.

हज्जार शब्‍द सांगत नाहीत
ते एका शब्‍दात कळवते,
ती मैत्री.

उद्‍वेगल्या मनाला
शीतल शांतवते,
ती मैत्री !!

आयुष्यात येताना जाताना लोक भेटतात

आयुष्यात येताना जाताना लोक भेटतात
एकमेकांच्या ओळखी होतात
एकमेकांमध्ये मैत्री होते
आणि ती ओळख अगदी द्रुढ होऊन जाते

पण एकदा अशी ओळख होते
जणू असे वाटू लागते
वर्षा वर्षांची मैत्री असावी
जेव्हा होते अशी ओळख
तेव्हा नाती जुळतात अनेक

अशी ही ओळख मित्रा मित्रांमधली
अशी ही ओळख नात्या नात्यांमधली
अशी ही ओळख तुझी नि माझी
जणू ती ओळख मनात जाऊन रुजते

कधी अशीच भेटते ती ओळखणारी व्यक्ति
कधीच न बोललेल्या गोष्टी आम्ही बोलतो
बोलता बोलता ती ओळख पाळख विसरून जातो
एकमेकांच्या विचारांत हरवून जातो......!!!!!!!!!!!!!!!!

मैत्री म्हणजे प्रेम

मैत्री म्हणजे प्रेम
मैत्री म्हणजे जाणीव
मैत्री शिवाय जीवनात
आधाराची उणीव

मैत्री म्हणजे विश्व
मैत्री म्हणजे आकाश
मैत्री म्हणजे तिमिरात
वाट दावणारा प्रकाश

मैत्री म्हणजे सुख दु:ख
मैत्री म्हणजे हर्श
मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा
हळुवार स्पर्श

मैत्री म्हणजे रान
मैत्री म्हणजे कोवळे उन
मैत्री म्हणजे जीव जडणारी
सुमधुर वार्याची धुन

मैत्री म्हणजे खेड
मैत्री म्हणजे पायवाट
मैत्री म्हणजे पिकाला
पाणी पाजणारा मळ्यातील पाट

मैत्री म्हणजे तेज
मैत्री म्हणजे तारा
मैत्री म्हणजे प्रत्येकाला
हवा असणारा मोहक वारा

मैत्री म्हणजे दिलेला शब्द
मैत्री म्हणजे आन
मैत्री म्हणजे घातलेली शपथ
मैत्री म्हणजे प्राण

मैत्री म्हणजे ओढ
मैत्री म्हणजे आठवण
मैत्री म्हणजे आयुश्यातील
न सम्पणारी साठवण

हृदय अर्पण करतात

हृदय अर्पण करतात
ती माणसं निराळीच असतात
पूर असतो त्यांच्या स्वभावात
किनारा सोडतात तेंव्हा नदीहून बेफाम होतात
कोसळतात खोल तेव्हा किती उंच जातात!

जशी हसतात फुलं, पूर्ण उमलतात,
उधळतात गन्ध्, गळून पडतात
नियतीचा सहज स्विकार हृदय देणारेच करतात

अश्रुंच्या प्रत्येक थेंबातून त्यांची गाणी फुलतात
प्रीतीचे दिव्य किरण त्यांच्यातून नित्य पाझरतात
ज्यांची दारे बंद होतात त्यांनाही आपले हृदय देतात

हृदय अर्पण करतात ती माणसं निराळीच असतात..!!!!!

मैत्रिची नाती खरंच इतकी पटकन कशी जुळतात...?

मैत्रिची नाती खरंच इतकी पटकन कशी जुळतात...?
रक्ताच्या नात्यांपेक्षा ही ती जास्तच जवळची का वाटतात.....?
सतत वाटत राहते,हे मैत्रीच नात असच आयुष्यभर टिकून र्हाव,
काही क्षणातच भासते जणू ओळख आहे खूप जुनी..

मैत्री अशी असावी ......

मैत्री अशी असावी ......
जीवनात साथ देणारी
हातात हात घेउन , शब्दान्शिवाय बोलानरी ....
मैत्री अशी असावी ......
जीवाला जीव देणारी ,
फ़ुलातल्या सुगन्धासारख,आयुष्यभर जपनारी......
मैत्री अशी असावी ......
हक्कान् राग्व्नारी ,
चुका ज़ाल्या तरी,मायेन समज़वानारी ........
मैत्री अशी असावी ......
आपल म्हानानारी ,
नजरेतले भाव जानुन,आपल्याला ओलाखानरी ........
मैत्री अशी असावी ......
बरोबर चलानारी,
कशीही वाट असली तरी मागे न फिर्नारी ........
मैत्री अशी असावी ......
वास्तवाच भान देणारी ,
कल्पनेच्या विश्वातही,माझ्यासवे रमनारी ......!!!!!

कधी कधी मैत्री अशीही असते कि

कधी कधी मैत्री अशीही असते कि
तुझं माझं ज़मेना आणि तुझ्यावाचून करमेना.
खूप भांडणं होतात पण मैत्रीचा पाया इतका भक्कम असतो की
मैत्रीला तडा ज़ाण्याएवज़ी ती अधिक मज़बूत होते.
वाट्टेल तसं भांडता येईल तरीही गैरसमज़ होणार नाहीत
अशी हक्काची ज़ागा हवीशी वाटते माणसाला.
एखादी मैत्री मशागत करून फुलवलेल्या सुंदर बागेसराखी असते
तर एखादी निसर्गदत्त देवारासारखी.
निगराणी न करताही हिरवीगार घनदाट!
मैत्रीचा गज़रा नेहमीच टवटवीत असावा त्याचा धागा समजूतदारपनाचा असावा.
दोन्ही बाजूंनी ताज़ी फुलं अखंड गुंफत राहावं......!!

हे आपल्या मैत्रीतुनच मी शिकले....!!

तुझ्या मुळे मैत्रीतले
वेगळे पैलु उलगडले.....!!
भेटीविना हे नातं कसं फुलतं
हे आपल्या मैत्रीतुनच मी शिकले....!!

उदात्त मैत्रीचे एकच मागणे....!!!!!

उदात्त मैत्रीचे एकच मागणे....!!!!!

चांदणे पांघरलेले आकाश नाही मागत तुझ्याकडे
क्षितिजावर लुकलुकणारा एक तारा मात्र आठवनीने दे

बेभान कोसळणारा मुक्त पाउस नाही मागत तुझ्याकडे
श्वासात दरवळणारा ओल्या मातीचा सुवास मात्र आठवनीने दे

बेधुंद करणार्या रातराणीचा बहर नाही मागत तुझ्याकडे
जाताना एक मोगर्याची कळी मात्र आठवनीने दे

उसळणारा बेछुट दर्या नाही मागत तुझ्याकडे
शांत जलाशयातील एक तरंग मात्र आठवनीने दे

मुठी एवढे ह्रुदय नाही मागत तुझ्याकडे
मझ्यासाठी चुकलेला एक ठोका मात्र आठवनीने दे

जिवनातल्या आनंदाचा एकही क्षण नाही मागत तुझ्याकडे
आयुष्यातल्या दु:खाचे पहिल्या पासून शेवटचे पळ मात्र आठवनीने दे
आठवनीने दे........

उदात्त मैत्रीचे एकच मागणे....!!!!!

एखाद्या माणसाला ओळखणे खूप अवघड असते

एखाद्या माणसाला ओळखणे खूप अवघड असते

कारण माणूस प्रत्येक क्षणाला अनुभव घेत असतो...

आणि प्रत्येक अनुभव माणसाला बदलत असतो....

त्यामुळे स्वत:चे निरीक्षण करणे हीच जगातील सर्वात गरजेची गोष्ट.. आहे ...

आपल्यातले सूक्ष्म बदल ज्यावेळी स्वत:ला जाणवतात ना ...

त्यावेळी आपण दुसर्याची काळजी घेण्यास पात्र असतो...

मैत्री....एक आनंदाचे झाड

मैत्री....
एक आनंदाचे झाड हक्काच्या
अंगणातले उभे
ऊन वारा सारे झेलुनही कधीही
न वाकणारे


मैत्री....
एक अनमोल शिंपला अवचित हाती मिळालेला
घाई नको उघडाया अलग़द उघडा
लख्ख प्रकाश
देणारा 'मोती'आला का हाती?मैत्री....
एक बिंदु आणि अनेक मिळालेले सेतु
पार पाडावा अगदी जणु सराव रोजचा

मैत्री....
एक बगीचा मनात सदैव फ़ुलणारा
माळी होऊन घ्यावी जीवापाड काळजी

मैत्री....
एक धागा सरळ रेशमी मऊसुत जसा
जास्त ताणला तर तुटतो बघा ना कसा

मैत्री....
एक रोपटे अबोलीचे
प्रत्येकाच्या दारातले
फ़ुले मुक हसती पाणी पिताना ओन्जळीत

कोसळणारा पाऊस पाहुन

कोसळणारा पाऊस पाहुन
मला नेहमीच एक प्रश्न पडतो
माझं तर ठीक आहे
पण हा कुणासाठी रडतो
दव पडलेल्या गवतावरून
जेव्हा मी हात फिर्व्ते
तुझे अश्रू पुसते
आसाच मला भास होतो
गोडीगुलाबी अन थोडासा रुसवा,
खुप सारे प्रेम अन थोडासा राग हवा,
नको अंतर नको दुरावा
पावसाला लाजवील, असा
असावा मैत्रीत ओलावा
मैत्री नको चंद्रा सारखी,
दिवसा साथ न देणारी,
नको सावली सारखी सदा पाठ्लाग करणारी
मैत्री असावी अश्रुन सारखी सदा सुख दु:खात साथदेणारी....!!!!

न संपणारे अखंड स्वप्न असावे,

न संपणारे अखंड स्वप्न असावे,
न एकू येतील असे शब्द असावेत,
ग्रीष्मातही पा‌उस पाडतील असे ढग असावेत,
आणि
न मागता साथ देतील असे सोबती असावेत.................

दोन मनांची अशी असावी मैत्री

दोन मनांची अशी असावी मैत्री
सुखात अन दु:खात टिकावी मैत्री...

दोघांपाशी काही उरले नाही;
दोघांमध्ये तरी उरावी मैत्री...

भेटगाठ घडते अथवा ना घडते
न भेटताही मनी जपावी मैत्री...

चढ-उतार असतातच नात्यांमध्ये
कठिण प्रसंगांतच दृढ व्हावी मैत्री...

'उपकारां'ची भाषा मैत्रीमध्ये?
द्यायचेच तर फक्त स्मरावी मैत्री...

जगायचे या जगात कोणासाठी?
जगायचे तर फक्त 'जगावी' मैत्री...

मिळतो मदतीचा हात

मिळतो मदतीचा हात,
हिच मैत्रीची सुरुवात

मैत्री म्हणजे
प्रत्येक पायरीवर एक हळुवार फ़ुंकर

मैत्री म्हणजे
प्रत्येक वळणावर एक भक्कम आधार

मैत्री म्हणजे
मायेची जिव्हाळ्याची साठवण
मनाने दिलेली मनाची आठवण

हा मैत्रीचा धागा नीट जपायचा असतो
कारण .....................
काही नाती तुटत नाहीत
ती आपोआप मिटुन जातात....!!!!!!!!!

जी माणसे हवीशी वाटतात......

जी माणसे हवीशी वाटतात
ती कधी भेटत नाही
जी माणसे नकोशी वाटतात
त्यांचा सहवास संपत नाही
ज्यांच्याकडे जावेशे वाटते
त्यांच्याकडे जायला जमत नाही
ज्यांच्याकडे जाऊ नये असे वाटते
त्यांच्याकडे जावेच लागते
जेंव्हा जीवन नकोसे वाटते
तेंव्हा काळ संपत नाही
जीवनामध्ये सुरुवातीस ज्यात अथ नाही असे वाटते,
त्यातच खूप अथ भरलेला आहे असे आयुष्याच्या शेवटी कळते
जेंव्हा जीवनाचा खरा अथ कळतो
तेंव्हा काळ संपलेला असतो
नशीब हे असच असते
त्याच्याशी जरा जपून वागाव लागत
तिथे कोणाचेच चालत नाही
जिकडे नेईल तिकडे जावेच लागते

मैत्री म्हणजे दोन जीवाना एकत्र आणणारी वाट असते....

मैत्री म्हणजे दोन जीवाना एकत्र आणणारी वाट असते....
मैत्री म्हणजे दोन जीवाना एकत्र आणणारी वाट असते.
दु;खाची रात्र जाऊन नव्या प्रेमाची पहाट असते.
मैत्री म्हणजे दोन जीवाना एकत्र आणणारी वाट असते.

मैत्री कुणाशी ही होऊ शकते म्हणतात
आणि ती झाल्यावर त्याला देवच मानतात
मैत्रीत दगड ही हिरे बनतात
आणि आयुष्यात एकमेकांच्या प्रकाश आणतात
कोणी काही म्हणो हे बंधन दाट असते
मैत्री म्हणजे दोन जीवाना एकत्र आणणारी वाट असते.

प्रेम आणि मैत्री तसे बघावे एकच आहे
त्याच्याशिवाय़ आयुष्यात जागा रिक्तच आहे
आयुष्यात एकदा मैत्री करणे गरजेचे आहे
जगात सर्वांनाच मिळणारे एक अतुट नाते आहे
एकदा तरी त्याचे रुप बघा खुप विराट असते
दु;खाची रात्र जाऊन प्रेमाची पहाट असते

मैत्री म्हणजे दोन जीवाना एकत्र आणणारी वाट असते.
दु;खाची रात्र जाऊन नव्या प्रेमाची पहाट असते.
मैत्री म्हणजे दोन जीवाना एकत्र आणणारी वाट असते....

असावे नात तुज्या बरोबर

असावे नात तुज्या बरोबर
बंध असूनही बंध नसावे...
मैत्रिच्या नात्या पेक्षा
ते मोठे असावे....
असावे हक्काचे ठिकान
जेथे थोडा निवान्तपना जवळ असावा
साधावे तू
गुज गुपित तुज्या मनाचे...
मनातले सख्या हे मैत्रिचे
तुज्या-माज्यत....
सद्दैव रहावे....
सद्दैव रहावे....!!!!!

क्षण गेलेले कधीच येणार नाहीत परतून

क्षण गेलेले कधीच येणार नाहीत परतून,
मात्र आठवणी त्यांच्या राहतील सदैव मनात घर करून ..

आनंदाचे क्षण काही, काही क्षण दुःखाचे ..
दूर जाताच आठवती क्षण सारे सोबतीचे ,

क्षण बालपणीच्या हट्टाचे, कॉलेजमधील मौजमजेचे..
समाधानाचे क्षण आणि काही कठीण प्रसंगाचे.

सरकतात डोळ्यापुढे जेव्हा भरून येतात डोळे,
वाटते फिरून यावेत आयुष्यात पुन्हा ते क्षण सारे

जिथे बोलण्यासाठी "शब्दान्ची" गरज नसते,

जिथे बोलण्यासाठी "शब्दान्ची" गरज नसते,
आनन्द दाखवायला "हास्यची" गरज नसते,
दुःख दाखवायला "आसवान्ची " गरज नसते,
न बोलताच ज्यामध्ये सारे समजते
ति म्हणजे " मैत्री


जो रक्ताची नातीच काय पण परक्याला पण खेचून आणतो
आपल्या ही मनाला तो जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो
हीच मैत्री .......तो विश्वाचा एक धागा असतो.....!!!!!!!!!!!!!!!!!

मैत्री म्हणजे

मैत्री म्हणजे विश्वास
मैत्री म्हणजे अभिमान
मैत्री म्हणजे जीवनातील
जगण्याचा स्वाभीमान

मैत्री म्हणजे प्रेम
मैत्री म्हणजे जाणीव
मैत्री शिवाय जीवनात
आधाराची उणीव

मैत्री म्हणजे विश्व
मैत्री म्हणजे आकाश
मैत्री म्हणजे तिमिरात
वाट दावणारा प्रकाश

मैत्री म्हणजे सुख दु:ख
मैत्री म्हणजे हर्श
मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा
हळुवार स्पर्श

मैत्री म्हणजे रान
मैत्री म्हणजे कोवळे उन
मैत्री म्हणजे जीव जडणारी
सुमधुर वार्याची धुन

मैत्री म्हणजे तेज
मैत्री म्हणजे तारा
मैत्री म्हणजे प्रत्येकाला
हवा असणारा मोहक वारा

मैत्री म्हणजे दिलेला शब्द
मैत्री म्हणजे आन
मैत्री म्हणजे घातलेली शपथ
मैत्री म्हणजे प्राण

मैत्री म्हणजे ओढ
मैत्री म्हणजे आठवण
मैत्री म्हणजे आयुश्यातील
न सम्पणारी साठवण

मैत्री म्हणजे मस्करी
मैत्री म्हण्जे राग
तरीही आपल्या जीवनातील
हा एक अविभाज्य भाग....!!!!!!!!!!!

मैत्री काय असते"

मैत्री काय असते"
आय़ुष्याची ती पहिली पायरी असते
दोन् मनाच्या भेटीचे ते पवित्रसे घरटे असते
वारा शोधणार्र्या सुगिन्धाची गाठ असते
चादण्यात उठुन दिसणारी चद्रकोर असते
सुख दु:खाची भरलेली मोठी जत्रा असते
आठवणीच्या फुलची फुलदाणी असते
म्रुत्यु नन्तरही अविरत राहणारी अशी असते
कधी न् तुटणारी अशी अतुट दोर असते
एकमेकाचा एकमेकावर असलेला विश्वास असतो
सर्वाना एकत्र बाधणारी गाठ असते
मैत्री असते काय?

मैत्री एक अस नात

मैत्री एक अस नात जे एकदा जोडले की कधीच तोड़ता येत नाही............


ज्या मध्ये जगन्यासाठी माणूस आपल सर्वस्व अर्पण करतो ...............



आणी या मैत्रीची एक ख़ास गोष्ट म्हणजे या नात्यात एखादा मैत्री झाली की सार्ख बोलावास वाटत..........



आपली सर्व सुख, दुःख आणी चूका कीव्वा हुशारी एक्मेकन्ना सांगून त्या वाटून घ्याव्याश्या वाटतात.......



मला नाही माहिती की हे सर्वान्नाच वाटत की नाही पण मझ्यामाते हाच मैत्रिचा खरा अर्थ आहे ........



जो सरवान्नी समजून घ्यावा...... वीश्वासच्या आधारावर बनलेली ही मैत्री मी तुझ्या बरोबर केली!!!!



मज़्यामते तू एक माझा चांगला मित्र आहेस ,



ही आपली मैत्री अखंड आयुष्यभर अशीच रहू दे हीच देवाकड़े प्रार्थना ...................



हे कुणा कवीचे कीव्वा कुणा इतिहासकाराचे बोल नहीयेत हे मझे आणी माझ्या मनाचे बोल आहेत ...........

आपल्या आयुष्यात

आपल्या आयुष्यात बरयाच व्यक्ती येतात आणी जातात,,
काही फ़क्त कारणासाठी साथ निभावतात..
तर काही एकटेपणाची भिती म्हणुन आयुष्यभर..
पण काही व्यक्ती अशा असतात की नकळत आपल्या आयुष्यात येतात आणी आयुष्याकडे बघायचा द्रुष्टिकोनच बदलून जातो...

मैत्री इतकी अवघड असते का ?

मैत्री इतकी अवघड असते का ?

समजायला, उमजायला, व्यक्त करायला

असं नक्की काय असतं त्यात

की लागते ती इतकी आवडायला

चार-दोन मोकळ्या गप्पा, जूळते सूर

पूढची भेट कधी वाटणारी हूरहूर

नंतर मग नुसतं डोळ्यांनी बोलणं

या मनीचं त्या मनी, कोण्या जन्मीचं देणं


निस्वार्थी, निरागस, निर्मळ अशी ही मत्री हवी

मत्री करावी आणि फ़क्त ती अनुभवावी .....!!!!!

तुझी आणि माझी मैत्री एक गाठ असावी.....

तुझी आणि माझी मैत्री एक गाठ असावी.....
कुठल्याही मतभेदाला तेथे वाट नसावी....
आनंदात असताना हसू तुज़े असावे.....
तू दुःखात असताना अश्रू माज़े असावे.....
मी एकाकी असताना साथ तुझी असावी....
तू मूक असताना शब्द माझे असावेत.....
तुझी नी माझी मैत्री जगासाठी एक आदर्श असावी.....
आणि प्रत्येक जन्मात तुझी माझी मैत्री अशीच टिकून रहावी .....!!!!!!!!!!!!

आपली मैत्री

आपली मैत्री
आयुष्याच्या वेलावर फुललेलं फुल
जसं एक खेळ्कर हसणारे मुल...

आपली मैत्री
हिवाळ्यातल्या सकाळचे दवबिंदु
नाही त्यात किंतु परंतु....

आपली मैत्री
संध्याकाळी आकाशी रंगाची उधळण
भिरभिरत्या मनाला मैत्रीचे कुंपण....

आपली मैत्री
झरझर पावसाची आहे सर
झुळझुळणारा झर्याचा हा निर्झर.....

आपली मैत्री
उबेत या जीवन सफल माझे तुझे
रक्ताचे नाही ह्रुदयाचे नाते....

आपली मैत्री
साजरा करायला मैत्रीचा दिवस हवा कशाला
मैत्रीच साजरी करतो आपण प्रत्येक क्षणाला......!!!!!!!!!

मैत्रीच नातं तुझं नि माझं,

मैत्रीच नातं तुझं नि माझं,
.....असंच राहू दे.

वाळवंट जरी मी,
.....नंदनवन फुलवून घे.

हृदय शुष्क जरी माझे,
.....मनीं आनंद पाझरु दे.

चुकले जरी मी,
.....बरोबर तू करुन घे.

दुःख जरी दिले मी,
.....सुख तू मानून घे.

निरपेक्ष जरी मी,
.....अपेक्षा तू राहू दे.

मैत्रीच नातं तुझं नि माझं,
.....असंच राहू दे.

ध्यानी जरी नसे मी,
.....मनात तव असू दे.

दूरदेशी असले जरी,
.....जवळीक तू असू दे.

तुझी आणि माझी " मैत्री " हा
.....सदा भाव राहू दे.

नयनातून माझिया ,
.....तव प्रेम ओघळू दे.

मैत्रीच नातं तुझं नि माझं,
.....असंच राहू दे.

माझ्या आयुष्यात एक तुझी मैत्री ही अशीच राहु दे ...

वर्ष सरतील.... सुख-दुःख सरतील....
एका नन्तर एक... त्या नन्तर एक...
.....आयुष्यातुन नाती आणी नातलगही सरतील....

क्षणाक्षणाच्या सुतानी विणलेली,
ऊन-वारयाशी सारखी झुन्ज देणारी,
आपली शाल कायम राहु दे......

.......माझ्या आयुष्यात एक तुझी मैत्री ही अशीच राहु दे....!!!!

जगण्याची जिद्द आहे

तुझी मैत्रि आहे म्हणुनच
जगण्याची जिद्द आहे
तुझ्या मैत्रितुन बाहेर पडले तर
लगेचच मरणाची हद्द आहे

तुझी मैत्रि आहे म्हणुनच
आयुष्याचा हा प्रवास आहे
तुझ्या मैत्रिशिवाय
जगण्याचा नुसताच भास आहे

तुझी मैत्रि आहे
म्हणुनच तुझ्यासमोर दोन अश्रू ढाळू शकते
वेड्या या जगात
जगण्याच्या मर्यादा मी पाळू शकते

तुझी मैत्रि आहे....
माझ्यासाठी काळोखातही मिणमिणता दिवा
जग जळतं माझ्यावर
कारण माझ्याकडं आहे तुझ्या मैत्रिचा ठेवा.....

मैत्री म्हणजे दोन मनानंच नाजुक बंधन

मैत्री म्हणजे दोन मनानंच नाजुक बंधन
मैत्री म्हणजे मनाने मनाला केलेले वंदन

मैत्री म्हणजे अबोल शांततेत होणारा संवाद
मैत्री म्हणजे काळजाला भिडणारा निनाद

मैत्री म्हणजे एकाच्या सुखासाठी दुसऱ्याच तडफडण
मैत्री म्हणजे स्वःताहा पडत असतानाही दुसऱ्याला सावरण

मैत्री म्हणजे स्पर्श न करता दिलेला आधार
मैत्री म्हणजे सहवासातुन साकार झालेला आकार

मैत्री म्हणजे वाळवंटात पाण्याचा झालेला भास
मैत्री म्हणजे शेवटच्या क्षणापर्यत घेतलेला श्वास

मैत्री म्हणजे एकाचा दुसऱ्यावर असलेला अतूट विश्वास
मैत्री म्हणजे दोघांच्याही नकळत होणारा अखंड प्रवास................

दोन मनांची अशी असावी मैत्री

दोन मनांची अशी असावी मैत्री
सुखात अन दु:खात टिकावी मैत्री...
दोघांपाशी काही उरले नाही;
दोघांमध्ये तरी उरावी मैत्री...
भेटगाठ घडते अथवा ना घडते
न भेटताही मनी जपावी मैत्री...
चढ-उतार असतातच नात्यांमध्ये
कठिण प्रसंगांतच दृढ व्हावी मैत्री...
'उपकारां'ची भाषा मैत्रीमध्ये?
द्यायचेच तर फक्त स्मरावी मैत्री...
जगायचे या जगात कोणासाठी?
जगायचे तर फक्त "आपल्या" मैत्रिसाठी...,,,,,,,,

क्षणांवर जगतो आपण

क्षणांवर जगतो आपण,
कारण क्षण आयुष्य घडवतात,
आठवणीत रमतो आपण,
कारण क्षण आठवणी बनवतात......

क्षण... काही आनंदाचे,
तर काही खूप दुख:चे,
क्षण.... हास्य-विनोदाचे,
तर काही फक्त रडण्याचे.......

क्षण असतात मैत्रीचे,
क्षण असतात प्रेमाचे,
क्षण असतात मायचे,
अन् आपण जोपासलेल्या नात्यांचेही.......

क्षणात येते दाटून भीती,
क्षणात सारे बळही येते,
येती कधी क्षण सोबतीचे,
तर कधी येती एकाकी क्षण.......

जन्माला येताना सगळी नाती मिळतात

जन्माला येताना सगळी नाती मिळतात,

पण मैत्रीचे रेशीम बंध स्वतःच जोडावे लागतात.

हिरे सगळे असले तरी, कोहिनूर एकच असतो.

म्हणूनच नाती सगळी असली तरी मैत्रीत जीव गुंततो

मैत्री म्हणजे विश्वास

मैत्री म्हणजे विश्वास
धिर आणी दिलासा,
मैत्री म्हणजे जिवांमधील सेतु
मैत्रीचा दुसरा अर्थ मी आणी तु

दोस्तीचा शिरकावा असा का
आभाळातुन होत नसतो,
जिवाचा जिवलग जोडायला
आधी जिव लावावा लागतो

संकटे समोर येत होती
जिवनात माझ्या धोका बनुन,
तारलेस तु माझे जिवन
सावरणारा हात बनुन

मैत्री फ़क्त म्हणण्यापुर्ती नसावी
तर ति निरंतर असावी
जशी सागराला किनारयाची
अखंड साथ असावी.......!!!!!

तुझ्या मैत्रिचा जिव्हाळा

तुझ्या मैत्रिचा जिव्हाळा

म्हणजे माझ्यासाठी जणु उन्हाळ्यातही

पावसाळा

तुझी मैत्रि म्हणजे आयुष्याच्या पुस्तकातलं

एखादं जाळीदार पान....

जसंजसं त्याचं आयुष्य वाढत जातं

तसंतसं त्याच्या सुंदरतेला तेज चढत जातं

तुझ्या मैत्रिविना आयुष्य धुसर धुसर

वाटेल...

तशी वाट सापडेल जगण्याची...

पण...हातात माझ्या हक्काच असं काही

नसेल

मैत्रिचा हा नाजुक धागा दोघांनीही आता

सांभाळायला हवा

मैत्रि एक धर्म...यास दोघांनीही पाळायला

हवा

येणारे येतात अन जाणारे जातातही... मैत्रि

सगळ्यांशीच होत नाही

मैत्रि सहज होवुन जाते ... करायची ठरवली

तरी ती करता येत नाही

तुझ्या माझ्या मैत्रिला वय नाही...

म्हणुनच वाटतं...तुझ्या माझ्या मैत्रिला भय

नाही

मैत्रिचा ठेवा हा असाच जपुन ठेव

तु हास अन दु:ख तुझी माझ्याआड लपवुन

ठेव

उद्या जर नस्लेच तुझ्यासोबत तरी माझे

शब्द असतील

तू हसत रहा माझ्यासाठी..तुला बघुन माझे

शब्दही हसतील

शब्दांनी नाही सांगु शकणार अशी तुझी मैत्रि

मी आहे तुझ्याबरोबर तुझ्या सुख दु:खात

एवढीच देऊ शकते तुला खात्री..

मैत्री असावी

मैत्री..
मैत्री असावी
दोन मानांची
एकमेकांना
समजून घेणारी...

मैत्री असावी
चंद्र तरकांची
एकमेकांना
साथ देणारी...

मैत्री नसावी
दोन क्षणांची
सुखात सोबत
पण दुखात विसरणारी...

मैत्री असावी
तुझी अन् माझी
दूर राहूनही
कायम जवळच असणारी....

तुझ्या मैत्रीची सावली....

तुझ्या मैत्रीची सावली....

सावली...
तुझ्या चेहऱ्याची सदैव दिसे नजरेत मला

सावली...
तुझ्या शब्दांची सदैव आठवे भुतकाळ मला

सावली...
तुझ्या हाताच्या स्पर्शाची सदैव जाणवे खांद्यावर मला

सावली...
तुझ्या एका हाकेची सदैव धिर दीई मला

सावली...
तुझ्या हास्याची सदैव हसवी मला

सावली...
तुझ्या सुखाची सदैव आनंदात ठेवी मला

सावली...
तुझ्या दुःखाची सदैव अश्रु देई मला

सावली...
तुझ्या अस्तित्वाची सदैव सोबत नेई दुर मला....


आनंदाचे सारे क्षण एकमेकांकडे हसत बघताना
आयुष्यातले सारे क्षण तुझ्या मैत्रीच्या सावली सोबत जगताना....!!!

मैत्री काय असते"

मैत्री काय असते"
केलेल्या निस्वार्थ प्रेमाचे प्रतिक असते,
आय़ुष्याची ती पहिली पायरी असते दोन् मनाच्या भेटीचे ते पवित्रसे घराटे असते,
वारा शोधणार्र्या सुगिन्धाची गाठ असते ,
चादण्यात उठुन दिसणारी चद्रकोर असते ,
सुख दु:खाची भरलेली मोठी जत्रा असते,
आठवणीच्या फुलची फुलदाणी असते ,
म्रुत्युनन्तरही अविरत राहणारी अशी असते ,
कधी न् तुटणारी अशी अतुट दोर असते ,
एकमेकाचा एकमेकावर असलेला विश्वास असतो ,
सर्वाना एकत्र बाधणारी गाठ असते मैत्री ....!!

तुझी मैत्री आली माज्या आयुष्यात अशी ......

तुझी मैत्री आली माज्या आयुष्यात अशी ......

जणू काळ्याकुट्ट रात्रीनंतर
यावी एखादी प्रसन्न सकाळ,
जसा अमावास्येच्या अंधारानंतर
पसरावा चांदण्यांचा शीतल प्रकाश.
तुझी मैत्री आली माज्या आयुष्यात अशी ......

जशी रखरखीत उन्हामध्ये
यावी रिमझिम पावसाची सर,
जशी उदास अंतरी
उठावी एक आनंदाची लहर.

तुझी मैत्री आली माज्या आयुष्यात अशी ......

जसे अंधारलेले मन
लाखो दिव्यांनी जावे झगमगून
जसा भरून आलेल्या आभाळातही
हळूच चंद्र दिसावा ढगांच्या आडून.

तुझी मैत्री आली माज्या आयुष्यात अशी ......

जसे संथ पाण्यामध्ये
उठावे हजारो तरंग,
जशी निराश झालेल्या मनी
जागून यावी जगण्याची उमंग....!

कधी कधी मैत्री

कधी कधी मैत्री अशीही असते की तुझं माझं ज़मेना आणि तुझ्यावाचून करमेना.
खूप भांडणं होतात पण मैत्रीचा पाया इतका भक्कम असतो की मैत्रीला तडा ज़ाण्याएवज़ी ती अधिक मज़बूत होते.
वाट्टेल तसं भांडता येईल तरीही गैरसमज़ होणार नाहीत अशी हक्काची ज़ागा हवीशी वाटते माणसाला.
एखादी मैत्री मशागत करून फुलवलेल्या सुंदर बगेसारखी असते तर एखादी निसर्गदत्त देवारासारखी. निगराणी न करताही हिरवीगार घनदाट! मैत्रीचा गज़रा नेहमीच टवटवीत असावा त्याचा धागा समजूतदारपनाचा असावा. दोन्ही बाजूंनी ताज़ी फुलं अखंड गुंफत राहावं

कुणीतरी असावे

कुणीतरी असावे
गालातल्या गालात हसणारं,
भरलेच जर डोळे कधी तर ओल्या असवांना पुसणारं,

कुणीतरी असावे
पैलतीरी साद घालणारं,
शब्दांना कानात साठवुन गोड प्रतिसाद देणारं,

कुणीतरी असावे,
चांदण्यांच्या बरोबर नेणारं,
अंधारलेल्या वाटेत आपल्याबरोबर येणारं,

कुणीतरी असावे,
फ़ुलांसारख फ़ुलणारं,
फ़ुलता फ़ुलता सुगंध दरवळणारं,

कुणीतरी असावे
आपल्या मनात रमणारं,
पलिकडील किना-यावरून आपली वाट पाहणारं

मैत्री म्हणजे काय???

मैत्री म्हणजे काय???
आपुलकी , ओढ , आस्था, कि........त्याहीपलिकडले ......
मनाच्या आणि ह्रदयाच्याही....पलिकडे
वास्तवतेत जगणार सत्य????

मैत्री , न तुटणार बन्धन
अस्तित्वात असणारी वास्तवता
तरिही......सामाजिक बन्धनाना तोलणारी
सुवर्णतुला......सुवर्णतुलाच नाही का????

मैत्री, मनान्ना जोडणारा सेतू
दोन वेगळ्या वळ्णान्ना जोडणारा हमरस्ता
रस्त्यालगतचा माईलस्टोन......
आठवणीत राहाणारा.....................

मैत्री, पुनवेचं...शुभ्र चान्दणं......
माझे तुला दोन शब्द
तुझे मला दोन शब्द
चादण्या समज़ुन मुठित दडवायचं......

मैत्री, रिमझिमणारा पाऊस
ट्पट्पणारे ओले थेम्ब..........
कधी आलं आभाळ भरुन तर
तर पावसासंगत बरसायचं...............

मैत्री, शब्दान्नाही माहित नसलेली कथा
भावनान्नाही न जाणवणारी विवशता
मैत्री.....प्रेमाच्याही पलिकडले गोड गुपीत.....
मैत्री..सु:ख-दु:ख जोपासणारी..मना-मनान्ची व्यथा...........

काही नाती जपावी लागतात

मैत्री
काही नाती जपावी लागतात
काही नाती मानावी लागतात
कितीही उसवली तरी पुन्हा पुन्हा विणावी लागतात..
पण मैत्रीचं असं नसतं..
कारण ते नातं असतचं मुळी अखंड एकसंध
त्याला ना सुरुवात ना शेवट..
तरीही पुर्ण ह्र्दय व्यापून उरणारं..
त्याला ना लागते सुई ना दोरा...
तरीही घट्ट विणलेलं...
एक एक टाका विणून लोकरीची मऊ ऊबदार शाल विणावी,
तितकीच मायेची ऊब देणारं हे नातं..
आभाळाइतकं अथांग,
सागराइतकं विशाल,
शब्दाविनाही भावना सांगणारं,
अन आयुश्य़भर साथ देणारं हे नातं,
जसं तुझं नी माझं....

मैत्री असं नाव आहे

दोघांच्याही मनात लपलेलं
भावनांचं एक गाव आहे
आणि भावनांच्या त्या गावाला
मैत्री असं नाव आहे...!!!

तू साथ दिल्यावर मला
मैत्रीचं नातं कळलं
म्हणूनच तुझ्याशी माझं
मग छान जमलं...!!!

देण्या-घेण्याची बेरीज
मैत्रीमध्ये शून्य आहे
मैत्रीची ही गणिताची रीत
म्हणूनच मला मान्य आहे...!!!

बंध तुझे माझे
असेच जुळून राहू देत
तुझे डोळे माझ्या नयनी
मैत्री सतत पाहु देत...!!!

आपल्या मैत्रीचा बंध हा
तुझ्या-माझ्यातील दुवा आहे
आणि मनापासून हा दुवा
दोघांनाही हवा आहे...!!!

मैत्री म्हणजे थोडं घेणं
मैत्री म्हणजे खूप देणं
मैत्री म्हणजे देता देता
समोरच्याचं होऊन जाणं...!!!

मैत्री म्हंटली की

मैत्री म्हंटली की
आठवतं ते बालपणं
आणि मैत्रीतून मिळालेलं
ते खरंखुरं शहाणपण

कोणी कितीही बोललं तरी
कोणाचं काही ऐकायचं नाही
कधीही पकडले गेलो तरी
मित्रांची नावं सांगायची नाही

मैत्रीचं हे नातं
सगळ्या नात्यात श्रेष्ठं
हे नातं टिकवण्यासाठी
नकोत खुप सारे कष्टं

मैत्रीचा हा धागा
रेशमापेक्षाही मऊ सूत
मैत्रीच्या कुशीतच शमते
मायेची ती सूप्त भूक

मैत्रीच्या सहवासात
श्रम सारे विसरता येतात
पण खरे मित्रं मिळवण्यासाठी
काहीदा कितीतरी पावसाळे जातात

मैत्री म्हणजे
रखरखत्या उन्हात मायेची सावली
सुखाच्या दवात भिजून
चिंब चिंब नाहली

मैत्रीचे बंध
कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देऊन
गालातल्या गालात हसणारे

मैत्री पाहत नाही
कोण गरीब कोण श्रीमंत
ती पाहते फ़क्त
मित्राचं अंतरंग

मैत्री म्हणजे
समाधानाने भरलेली ओंजळ
वाळवंटात जसं कधी
सापडतं मृगजळ

मैत्रीच्या सहवासात
अवघं आयुष्य सफ़ल होतं
देवाच्या चरणी पडून जसं
फ़ुलांचही निर्माल्य होतं

मैत्री हा असा एक धागा

मैत्री हा असा एक धागा,
जो रक्ताची नातीच काय
पण परक्यालाही खेचून आणतो
आपल्याही मनाला जवळचा करून ठेवतो
आपल्या सुख-दु:खात तो स्वत:ला सामावून घेतो.

मैत्री करण्यासाठी नसावं
लागतं श्रीमंत आणि सुंदर
त्याच्यासाठी असावा लागतो
फ़क्त मैत्रीचा आदर

काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.

मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?

कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात

या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला
मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कलातो
Thanks 4 beaing My Such A Nice Friend

मैत्री एक गोड नात

मैत्री
मैत्री एक गोड नात
मित्रत्वाचा गोडवा देत
मित्रत्व एक नाजूक धागा
म्हणूनच त्याची हृदयात जागा

मित्रत्वला बांधील मित्र असतात
जे मैत्रिला खरा अर्थ देतात
खरे मित्र नशीबनेच मिळतात
मीही एक नशीब वंत

माझे मित्र भावना निष्ठ
आमची मैत्री खूप घनिष्ठ

माझ्या सुख-दुखात ते पुरून उरतात
भावनांना आधार देतात
मनातली दुख: वाहून नेतात
सुखात आनंदाचा वर्षाव करतात
कोणासाही हेवा वाटेल अशी आमची मैत्री
आयुष्यभर टिकून राहील अशी आहे खात्री

मैत्री म्हणजे काय असत?

मैत्री म्हणजे काय असत?
एकमेकांचा विश्वास असतो?
अतूट बंधन असत? की
हसता खेळता सहवास असतो?
मैत्री म्हणजे मैत्री असते,
व्याख्या नाही तिच्यासाठी;
अतूट बंधन नसत,
त्या असतात रेशीमगाठी
मैत्री असते पहाटेच्या दवासारखी,
थंडगार स्पर्श करणारी;
मैत्री असते केवड्यासारखी,
तना-मनात सुगंध पसरवणारी
मैत्री असते सुर्योदयासारखी,
मनाला नवचैतन्य देणारी;
मैत्री असते झाडासारखी,
उन्हात राहून सावली देणारी;
मैत्री करावी सोन्यासारखी,
तावुन-सुलासुलाखून चमचमणा;
मैत्री करावी हिर्या सारखी,
पैलू पडताच लख-लखणारी;
मैत्री असावी पहाडासारखी,
गगनाला भिडणारी;
मैत्री असावी समुद्रासारखी,
तलाचा थान्ग नसणारी;
मैत्री म्हणजे समिधा असते,
जीवन यद्न्यात अर्पण झालेली;
स्वताच्या असन्याने सुद्धा
मन पवित्र करणारी;
मैत्री हे नाव दिलय
मनाच्या नात्यासाठी;
अतूट बंधन नसत त्या असतात ...
रेशीमगाठी ....

काही माणसे असतात खास

काही माणसे असतात खास
जि मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही
कायम साथ देत राहातात.

काही माणसं मात्र
म्रुगजळाप्रमाणे भासतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या
तेवढेच लांब पळत जातात.

काही माणसे ही गजबजलेल्या
शहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच
आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात.

मात्र काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मानाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात

आयुष्यातली येणारी प्रत्येक गोष्ट

आयुष्यातली येणारी प्रत्येक गोष्ट
क्षणभंगुर असते तरीही चालायचं
प्रत्येक दिवस, दिवसातला हरेक क्षण
हसत जगायचा प्रयत्न करायचा.

आयुष्यासुद्दा एक जेवणचं असतं
चवी-चवीने जगण्यासारखं.
नेहमी काय गोड गोड खायचं
कधीतरी कारल्याच्या भाजीसारखं कडु खाऊन बघायचं
कारल्याच्या भाजी खाल्ल्यासारखं
कुणाशीतरी हक्काने भांडायचं असतं
प्रत्येकजण आयुष्याच्या स्टेप्स एकटेचं चालतं असतो.
कुठेतरी वाटेत थकून थांबतो
वाटतं की आता चालूचं नये.
इथेचं थांबावं पण अचानक कुणीतरी
असचं दमलेलं आपल्याला भेटतं
अन् सोबत चालायला लागतं
जेव्हा आपण डेस्टीनेशनला पोचतो
आपण वळुन बघतो
वाटतं एकटं चालुन मी इथे पोचलो असतो का?

कुणाचीतरी सोबत असल्यावर जगणं ही सोप्पं होऊन जातं

त्यामुळे जोपर्यंत कुणी मनापासुन आपलेपण
देतं असेल तर घेऊन टाकायचं.
काय माहीतं उद्या ते आपलेपण नसेल ही....

कारण आयुष्यातली येणारी प्रत्येक गोष्ट क्षणभंगुर असत

मैत्रि तुझी अशी असावी

मैत्रि तुझी अशी असावी,

आयुश्यभर सोबत राहावी,

नको कधि त्यात दुरावा ,

नेहमीच नवा फ़ुलोरा,

मैत्रि अपुली अशी असावी,

सर्वांना एकत्रित अनावी,

हसने रुसने चालत राहवे,

एकमेकांना समजुन घ्यावे,

मैत्रि आपण अशी जगवी,

एकमेकांचा आधार असावी,

सुख दुखात नेहमी सोबत असवी,

असे हे आपले मैत्रिचे नाते नेहमीच जपावे,

तुझी मझी मैत्रि अशी असावी

मैत्री असावी फ़ुलासारखी

मैत्री असावी फ़ुलासारखी
नाजुक, सुंदर, गोजिरी;
मात्र नसावी कोमेजून जाणारी!

मैत्री असावी इंद्रधनुसारखी,
सप्तरंग उधळणारी;
पण नसावी भासमान, नष्ट होणारी!

मैत्री असावी रेशमासारखी...
दोन मनांना हळुवार जोडणारी;
पण प्रयत्न करुनही न तुटणारी!

काही ओळी फ़क्त आपल्या मैत्रिसाठी................

काय जादू असते या मैत्रीत !
मैत्री शिकवते जगण्याचा खरा अर्थ
मैत्री बदलून टाकते आयुष्याचे सारे संदर्भ
मैत्री देते आपुलकी प्रेम अन् विश्वास
मैत्री भारुन टाकते आपला श्वास अन् श्वास
कधी कधी वाटतं
समुद्राच्या काठावर शिंपल्यांची रास पडलेली असावी
आपण भान विसरुन लहान मुलासारखं
त्यात खेळत असावं
शिंपलेच शिंपले...
विविध रंगांचे, विविध आकारांचे, विविध प्रकारचे...
सहजपणे त्यातला एखादा शिंपला उचलून घ्यावा
अलगद उघडावा
अन् त्यात मोती सापडावा
खराखुरा, तुझ्यासारखा
खरं सांगू का !
मोतीसुद्धा लाभावा लागतो
तुझ्यासारखा....!

मैत्री म्हणले की


एक प्रवास मैत्रीचा

एक प्रवास मैत्रीचा
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..

एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
न बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..

एक प्रवास शुन्याचा
जणु हीमालयाशी भिडण्याचा
शुन्यातुन नवे जग साकारणारा
अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा..

एक प्रवास जगण्याचा
क्शणा क्शणाला माणुस घडवण्याचा
हसता हसता रडवणारा
अन रडवुन हळुच हसवणारा..

एक प्रवास प्रेमाचा
भुरभुरणार-या दोन जिवांचा
जिंकलो तर संसार मांडायचा
अन हरलो तर नवीन वाटा शोधायच्या..

एक प्रवास प्रयत-नांचा
सुख़ दुख़ातील नाजुक क्शणांचा
अखंड घडवणार-या माणुसकीचा
अन नवी उमेद देणार-या घडींचा..

एक प्रवास..
तुमच्या आमच्या आवडीचा
साठवु म्हंटले तर साठवणींचा
आठवु म्हंटले तर आठवणींचा
हर एक प्रवास मैत्रीचा
जश्या हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येवुन जावी
अन एक् सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी..

एक प्रवास सहवासाचा
जणु अलगद पडणार-या गारांचा
न बोलताही बरच काही सांगणारा
अन स्पर्श न करताही मनाला भिडणारा..

मैत्री


काही नाती बांधलेली असतात

काही नाती बांधलेली असतात
ती सगळीच खरी नसतात
बांधलेली नाती जपावी लागतात
काही जपून ही पोकळ राहतात
काही मात्र आपोआप जपली जातात
कदाचित त्यालाच मैत्री म्हणतात.


जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती मैत्री
फ़क्त मैत्री...........


मोहाच्या नीसटत्या क्षणी
परावृत्त करते ती मैत्री,
जीवनातल्या कडूगोड क्षणांना
निशब्द करते ती मैत्री,
जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावलला
साथ देते ती मैत्री,
आणि जी फक्‍त आपली असते,
ती मैत्री

चांगल्या मैत्रीचा ठेवा भाग्यवंतांनाच मिळतो!

चांगल्या मैत्रीचा ठेवा भाग्यवंतांनाच मिळतो,

गर्दीतल्या थोड्यांशीच आपला सूर जुळतो.... १

सुरात गायलेलं मैत्रीचं गीत आयुष्याला सुरेल करतं,

अशा गीताचं माधुर्य आयुष्यभर पुरुन उरतं....२

सुदैवाने आपल्यातही असंच मधुर नातं आहे,

त्याच्या आधाराने आयुष्य सुखात व्यतीत होतं आहे....३

आपलं नातं कायम राहो हीच एक सदिच्छा,

जीवनातील प्रत्येक क्षणासाठी तुला खूप शुभेच्छा!!...

मैञि

मैञि
एक हक्काच मायेच ठिकाण
जिथे आयुष्यातले , जिवनातले
सगळे रन्ग पाहता येतात
जिथे हसता-बोलता येत
रागावण रुसण नि अगदी
भान्डुणसुद्धा होत
अस दुकान जिथल तराजु
नेहमीच समतोल राहत
प्रेमाचा-मायेचा
असा गाव जिथे
प्रत्येकजण जातो
मी... तुम्ही... अगदी सर्वच जण.............

मैत्री ठरवून होत नाही !

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे,

मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे....

मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे,

आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे....

मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट,

ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट..

तुझी-माझी मैत्री म्हण्जे आयुष्याचा ठेवा,

मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा

Wednesday, July 9, 2008

When is Friendship Day?

Celebrate Friendship Day 2008 on August 3, Sunday
Human beings are social creatures and have always valued the importance of friends in their lives. To celebrate this noble feeling it was deemed fit to have a day dedicated to friends and friendship. Accordingly, first Sunday of August was declared as a holiday in US in honor of friends by a Proclamation made by US Congress in 1935. Since then, World Friendship Day is being celebrated every year on the first Sunday in the month of August.

This beautiful idea of celebrating Friendship Day was joyfully accepted by several other countries across the world. And today, many countries including India, celebrate the first Sunday of August as Friendship Day every year. Celebrating Friendship Day in a traditional manner, people meet their friends and exchange cards and flowers to honor their friends. Lot many social and cultural organization too celebrate the occasion and mark Friendship Day by hosting programs and get together.

It may be noted that some associations celebrate Friendship Day in an entirely different time of the year and with different customs. For instance,
  • National Friendship Day is on the first Sunday in August.
  • Women's Friendship Day is on the third Sunday in August
  • International Friendship Month is February
  • Old Friends, New Friends Week is the third week of May

However, what is remarkably same is the idea behind the celebration of the day. Everywhere, people express love for their friends and cherish their presence in life.

Friendship Day Celebration Ideas

Friendship Day is the perfect occasion to let your friends know how much they are needed and loved. The day calls for celebrations and enjoyment in the company of closed pals and chums!! The best way to celebrate Friendship Day would be to spend the day in a way your friendship group enjoys the most. In case you want to be creative and do something different to mark this significant day, here are some Friendship Day celebration ideas just for you. So go ahead and have a fabulous and over-the-top Friendship Day celebration!

Organize a Friendship Day Party
The most special way to celebrate Friendship Day would be hold a party for your new friends and old and have a blast. However, this idea needs a little planning and effort as you need to decide where to party, how to party, what to include in menu, what to play on the jukebox so on and so forth. Once that's done, call up your buddies and just have your fling !

Tips for Party Planning
  • Design a special invite for friends. You may include cartoons, jokes and nice quotes to set the mood of the party and tempt your friends to come over.
  • Inform your friends about the nature of the party whether it will be a day party or over-night party. Picnicking would be yet another sprightly thought for your Friendship Day party.
  • Once the kind of your Friendship Day party is fixed, decide on the menu. In case of a picnic plan for cooking with your friends. It will be great fun.
  • You may also plan out indoor or outdoor game session with your friends.
  • Also incorporate a music session with your friends. You may chose to play the music yourself, list to music or dance on it depending on the preference of your friends club.
  • Keep the camera ready and capture the precious moments on your Friendship Day party.
  • Bind your buds in the friendship bond with the friendship bands. You can make them yourself or pick them up from the stores.
More Friendship Day Celebration Ideas
Here are some ideas of celebrating Friendship Day. The idea is to spend spend quality time with your friends and have a great time.

Camping Out
Camp out can be your chance to check out on your favorite sets of outdoor sports-trekking, beach volleyball, basketball, baseball, rugby, swimming, surfing and more in the company of your best pals. Just choose a sport which your group enjoys and take a dive into a zesty, action-packed Friendship Day celebration !

Sharing Thoughts and Views
For many the best kind of Friendship Day celebration is perhaps a heart-to-heart talk with a soul mate. Sharing everything that has mattered to you and your friend for so long and for so many days and catching up with each others life is a relaxing way of celebrating Friendship Day.

Recollect Sweet Memories
A great way to celebrate Friendship Day in a memorable way would be make an album of your most intimate and special moments spent together. This can also be the most touching Friendship Day activity for you and your friend as it will help you to rewind and relive your time-tested bonding.

Make a Poster
A great idea to celebrate friendship in a creative manner would be to create a poster on Friendship Day. For instance you may paint your name and your friend's name on it creatively and revel in the joy when your friend flashes that million-dollar smile.

Friendship Day in India

Friendship Day has come to be celebrated in a big way in India. The noble idea of honoring friends and friendship has really caught on with the youth in India and one can see the festival being enthusiastically celebrated by the youth especially, students.

Day Dedicated to Friends
In tune with the spirit of the occasion, people dedicate Friendship Day festival to their best friends. Most choose to celebrate the entire day in the loving company of their dearest friends. Recollecting sweet memories of the time spent together and catching up with their lives over a cup of coffee is the idea of ideal Friendship Day celebration for many.

Friends separated by geographical distances, call up their friends to express love and warmth for each other and to wish a "Happy Friendship Day". With more and more people getting hooked to the net, many people also choose to chat with their friends with the help of Internet. Sending SMS and Friendship Day e-cards is another popular way of greetings friends.

Friendship Day Celebrations in Schools and Colleges
Friendship Day celebrations are particularly marked in schools and colleges in India. Euphoria of the day sets in days before the festival as everybody gets excited to wish their best friends in their own special way. Children make Friendship Day Cards or other special gift to thank their friends for their wonderful presence in their life. Exchange of Friendship Bands is the other most prominent feature of Friendship Day celebrations. Friends vie with each other as to who gets the most stylish band or who gets the maximum number of bands.

In several colleges, special programs are also organized to mark the occasion. Most of these programs and events intend to give youth an opportunity to dance and sing with friends and have a good time.

Friendship Day Parties
Following their counterparts in the west, youth in India too mark Friendship Day by participating in Friendship Day parties or organizing bashes for their friends. Major crowd for Friendship Day can be seen in discotheques and pubs where people dance with friends on fast pace music and cherish the loving company of their pals. Such parties also give youth a chance to make new friends and widen their friendship circle. At present such bashes are more popular in metros and other big cities, however, youth in small towns too are warming up to the idea of partying on Friendship Day.

Commercialization of Friendship Day
Just as in US and several other countries, Friendship Day has been commercialized to a great extent in India. Days before the festival, gift marketers run an extensive campaign to lure the people to buy cards and gifts for their friends. Restaurateurs too try to entice people by offering special discounts or holding bashes. Several people criticize such excessive campaigning. They feel commercialization has marred to the idea behind observing Friendship Day and has turned it into a mere formality. Some people however feel that advertising campaign has helped to generate awareness about Friendship Day festival and the idea of having a day dedicated to friends.

Tribute to Friend

Significance of Friends
True friendship is about putting your feet up and knowing that someone is there to bail you out when the world might walk out on you. Besides, as a support system in today's hectic world, friends are the most reliable sources for social, intellectual and creative stimulations.

In the present fast pace age of nuclear families where people have little time to spend with each other, friends have become indispensable. Then there are times when we find it tough to discuss matters with our family members or even with our spouse, it is on occasions such as these that friends come to our support. They guide us and become our pillar of strength when we need them most. And the best part is we don't really need to put things in words when communicating issues to our best friends. Most often friends understand us, just by looking at us or hearing our voice. This heart-to-heart bonding is what makes friendship so exclusive, setting it apart from all other relationships.

Significance of Expressing Love to Friends
Howsoever strong a relationship maybe, it constantly needs to be nurtured with love and care. We must therefore never lose an opportunity to express our feelings and the warmth we may be experiencing for our friends. We may do this by sending flowers, a heartfelt card or a thoughtful gift. We may also do this by being together with a friend in times of joy or sorrow. The idea is to keep expressing our unconditional love and support to our dearest friend let the friendship evolve.

Significance of Friendship Day
At times we get so busy in our daily lives that we start taking our friends for granted. It is the annual celebration of Friendship Day that reminds us that we must cherish the presence of friends in our lives and acknowledge with love the important role they play in our lives. One must therefore celebrate friendship on Friendship Day to the fullest and let their friendship soar to newer heights.

Friendship Day History

Friendship Day History

There is not much literature on Friendship Day history as we celebrate today. However, there are numerous folktales and several instance in mythological legends that shows that friends and friendship have been valued since the beginning of civilized world. As an intrinsically social creature, men love to make friends to further this process of socialization.
History of Friendship Day in US
Considering the valuable role friends play in our life it was deemed to fit to have a day dedicated to friends and friendship. The United States Congress, in 1935, proclaimed first Sunday of August as the National Friendship Day. Since then, celebration of National Friendship Day became an annual event. The noble idea of honoring the beautiful relationship of friendship caught on with the people and soon Friendship Day became a hugely popular festival.

Following the popularity and success of Friendship Day in US, several other countries adopted the tradition of dedicating a day to friends. Today, Friendship Day is enthusiastically celebrated by several countries across the world including India.

In 1997, the United Nations named Winnie - the Pooh as the world's Ambassador of Friendship.

Importance of Friendship in Bible
The Bible, the primary text of the western civilization, reflects upon friendship as the bond that forms the foundation to human faith, trust and companionship. Following verses from the bible aptly portray the importance of friends:

"Ask and it will be given to you; seek and you will find; knock and the door will be opened to you.”
Matthew 7:7

“Greater love hath no man than this that a man lay down his life for his friends.”
John 15:13-15

Besides, there are several tales from the Old Testament and the New Testament about the value of friendship and how true friendship is a treasure to unearth. A noticeable point is that, both the versions make a difference between the two broad meanings of friendship- one is a mere acquaintance, the other is a more affectionate relation.

In the Old Testament, Abraham is called the “friend of God” because of the intimacy of his relations. God speaks to Moses face to face “as a man…unto his friend” (Ex 33:11). The romantic friendship of Ruth and Naomi, the devotion of the subordinate Hushai for David, or the mutual relation between David and Jonathan - the Old Testament is replete with these interesting tales of friends and friendship.

In the New Testament, the relationship between Jesus and his disciples clearly depicts how human friendship can constantly grow. From being teacher and disciple, to lord and servant their relationship finally grew to an unparalleled friendship.

Importance of Friendship in Mahabharata
In the famous Hindu epic ‘Mahabharata’, Lord Krishna demonstrates the many colors of friendship - affection, romance, brotherhood, protection, guidance, intimacy and even teasing. Friendship is all about these and much more.

Friendship Day Wallpapers


r

a friend like you






Everyone should have
a friend like you
You are so much fun to be with
And you are such a good person
You crack me up with laughter
And touch my heart with your kindness
You have a wonderful ability
To know when to offer advice
And when to sit in quiet support
Time after time
You've come to my rescue
And brightend so many
Of my routine days
And time after time
I've realized how fortunate
I am that my life includes you
I really do believe that
Everybody should have a friend like you
But so far it looks like
You are one of a kind!