Friday, July 11, 2008

आयुष्यातली येणारी प्रत्येक गोष्ट

आयुष्यातली येणारी प्रत्येक गोष्ट
क्षणभंगुर असते तरीही चालायचं
प्रत्येक दिवस, दिवसातला हरेक क्षण
हसत जगायचा प्रयत्न करायचा.

आयुष्यासुद्दा एक जेवणचं असतं
चवी-चवीने जगण्यासारखं.
नेहमी काय गोड गोड खायचं
कधीतरी कारल्याच्या भाजीसारखं कडु खाऊन बघायचं
कारल्याच्या भाजी खाल्ल्यासारखं
कुणाशीतरी हक्काने भांडायचं असतं
प्रत्येकजण आयुष्याच्या स्टेप्स एकटेचं चालतं असतो.
कुठेतरी वाटेत थकून थांबतो
वाटतं की आता चालूचं नये.
इथेचं थांबावं पण अचानक कुणीतरी
असचं दमलेलं आपल्याला भेटतं
अन् सोबत चालायला लागतं
जेव्हा आपण डेस्टीनेशनला पोचतो
आपण वळुन बघतो
वाटतं एकटं चालुन मी इथे पोचलो असतो का?

कुणाचीतरी सोबत असल्यावर जगणं ही सोप्पं होऊन जातं

त्यामुळे जोपर्यंत कुणी मनापासुन आपलेपण
देतं असेल तर घेऊन टाकायचं.
काय माहीतं उद्या ते आपलेपण नसेल ही....

कारण आयुष्यातली येणारी प्रत्येक गोष्ट क्षणभंगुर असत

No comments: