्ह्दयात कुणाच्यातरी नेहमीसाठी बसावं....,
बसून ह्दयात मग शांतपणे रहावं....!
हक्काने कुणावरतरी कधीतरी रुसावं.....,
मग त्याच्याच समजूतीने क्शनभर विसावं....!
वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!
वाटत कधी-कधी खूप मूसमूसुन रडावं......,
ह्ळूच येवून त्याने मग अश्रू अलगद पुसावं.....!
वाटत कधी-कधी कुणाचतरी होउन पाहावं.....,
कुणाच्यातरी प्रेमात आपणही न्हाउन निघावं....!.
वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!
वाटत कधी-कधी आपणही स्वप्न बघावं.....,
क्शनभर का होइना स्वतःला विसरुन बघावं......!
वाटत कधी-कधी आपणही लिहून बघावं.....,
लिहीता-लिहीता का होइना आपणही प्रेमात पडावं.....!!
वाटतं कधी-कधी आपलही कुणी असावं.....!!
Friday, July 11, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment