मैत्री म्हणजे दोन जीवाना एकत्र आणणारी वाट असते....
मैत्री म्हणजे दोन जीवाना एकत्र आणणारी वाट असते.
दु;खाची रात्र जाऊन नव्या प्रेमाची पहाट असते.
मैत्री म्हणजे दोन जीवाना एकत्र आणणारी वाट असते.
मैत्री कुणाशी ही होऊ शकते म्हणतात
आणि ती झाल्यावर त्याला देवच मानतात
मैत्रीत दगड ही हिरे बनतात
आणि आयुष्यात एकमेकांच्या प्रकाश आणतात
कोणी काही म्हणो हे बंधन दाट असते
मैत्री म्हणजे दोन जीवाना एकत्र आणणारी वाट असते.
प्रेम आणि मैत्री तसे बघावे एकच आहे
त्याच्याशिवाय़ आयुष्यात जागा रिक्तच आहे
आयुष्यात एकदा मैत्री करणे गरजेचे आहे
जगात सर्वांनाच मिळणारे एक अतुट नाते आहे
एकदा तरी त्याचे रुप बघा खुप विराट असते
दु;खाची रात्र जाऊन प्रेमाची पहाट असते
मैत्री म्हणजे दोन जीवाना एकत्र आणणारी वाट असते.
दु;खाची रात्र जाऊन नव्या प्रेमाची पहाट असते.
मैत्री म्हणजे दोन जीवाना एकत्र आणणारी वाट असते....
Friday, July 11, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment