Friday, July 11, 2008

काही नाती जपावी लागतात

मैत्री
काही नाती जपावी लागतात
काही नाती मानावी लागतात
कितीही उसवली तरी पुन्हा पुन्हा विणावी लागतात..
पण मैत्रीचं असं नसतं..
कारण ते नातं असतचं मुळी अखंड एकसंध
त्याला ना सुरुवात ना शेवट..
तरीही पुर्ण ह्र्दय व्यापून उरणारं..
त्याला ना लागते सुई ना दोरा...
तरीही घट्ट विणलेलं...
एक एक टाका विणून लोकरीची मऊ ऊबदार शाल विणावी,
तितकीच मायेची ऊब देणारं हे नातं..
आभाळाइतकं अथांग,
सागराइतकं विशाल,
शब्दाविनाही भावना सांगणारं,
अन आयुश्य़भर साथ देणारं हे नातं,
जसं तुझं नी माझं....