जी माणसे हवीशी वाटतात
ती कधी भेटत नाही
जी माणसे नकोशी वाटतात
त्यांचा सहवास संपत नाही
ज्यांच्याकडे जावेशे वाटते
त्यांच्याकडे जायला जमत नाही
ज्यांच्याकडे जाऊ नये असे वाटते
त्यांच्याकडे जावेच लागते
जेंव्हा जीवन नकोसे वाटते
तेंव्हा काळ संपत नाही
जीवनामध्ये सुरुवातीस ज्यात अथ नाही असे वाटते,
त्यातच खूप अथ भरलेला आहे असे आयुष्याच्या शेवटी कळते
जेंव्हा जीवनाचा खरा अथ कळतो
तेंव्हा काळ संपलेला असतो
नशीब हे असच असते
त्याच्याशी जरा जपून वागाव लागत
तिथे कोणाचेच चालत नाही
जिकडे नेईल तिकडे जावेच लागते
Friday, July 11, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment