कुणीतरी असावे
गालातल्या गालात हसणारं,
भरलेच जर डोळे कधी तर ओल्या असवांना पुसणारं,
कुणीतरी असावे
पैलतीरी साद घालणारं,
शब्दांना कानात साठवुन गोड प्रतिसाद देणारं,
कुणीतरी असावे,
चांदण्यांच्या बरोबर नेणारं,
अंधारलेल्या वाटेत आपल्याबरोबर येणारं,
कुणीतरी असावे,
फ़ुलांसारख फ़ुलणारं,
फ़ुलता फ़ुलता सुगंध दरवळणारं,
कुणीतरी असावे
आपल्या मनात रमणारं,
पलिकडील किना-यावरून आपली वाट पाहणारं
No comments:
Post a Comment