मैत्री म्हणजे दोन मनानंच नाजुक बंधन
मैत्री म्हणजे मनाने मनाला केलेले वंदन
मैत्री म्हणजे अबोल शांततेत होणारा संवाद
मैत्री म्हणजे काळजाला भिडणारा निनाद
मैत्री म्हणजे एकाच्या सुखासाठी दुसऱ्याच तडफडण
मैत्री म्हणजे स्वःताहा पडत असतानाही दुसऱ्याला सावरण
मैत्री म्हणजे स्पर्श न करता दिलेला आधार
मैत्री म्हणजे सहवासातुन साकार झालेला आकार
मैत्री म्हणजे वाळवंटात पाण्याचा झालेला भास
मैत्री म्हणजे शेवटच्या क्षणापर्यत घेतलेला श्वास
मैत्री म्हणजे एकाचा दुसऱ्यावर असलेला अतूट विश्वास
मैत्री म्हणजे दोघांच्याही नकळत होणारा अखंड प्रवास................
Friday, July 11, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment