कधी कधी मैत्री अशीही असते की तुझं माझं ज़मेना आणि तुझ्यावाचून करमेना.
खूप भांडणं होतात पण मैत्रीचा पाया इतका भक्कम असतो की मैत्रीला तडा ज़ाण्याएवज़ी ती अधिक मज़बूत होते.
वाट्टेल तसं भांडता येईल तरीही गैरसमज़ होणार नाहीत अशी हक्काची ज़ागा हवीशी वाटते माणसाला.
एखादी मैत्री मशागत करून फुलवलेल्या सुंदर बगेसारखी असते तर एखादी निसर्गदत्त देवारासारखी. निगराणी न करताही हिरवीगार घनदाट! मैत्रीचा गज़रा नेहमीच टवटवीत असावा त्याचा धागा समजूतदारपनाचा असावा. दोन्ही बाजूंनी ताज़ी फुलं अखंड गुंफत राहावं
No comments:
Post a Comment