Friday, July 11, 2008

मैत्री इतकी अवघड असते का ?

मैत्री इतकी अवघड असते का ?

समजायला, उमजायला, व्यक्त करायला

असं नक्की काय असतं त्यात

की लागते ती इतकी आवडायला

चार-दोन मोकळ्या गप्पा, जूळते सूर

पूढची भेट कधी वाटणारी हूरहूर

नंतर मग नुसतं डोळ्यांनी बोलणं

या मनीचं त्या मनी, कोण्या जन्मीचं देणं


निस्वार्थी, निरागस, निर्मळ अशी ही मत्री हवी

मत्री करावी आणि फ़क्त ती अनुभवावी .....!!!!!

No comments: