Friday, July 11, 2008

मैत्री....एक आनंदाचे झाड

मैत्री....
एक आनंदाचे झाड हक्काच्या
अंगणातले उभे
ऊन वारा सारे झेलुनही कधीही
न वाकणारे


मैत्री....
एक अनमोल शिंपला अवचित हाती मिळालेला
घाई नको उघडाया अलग़द उघडा
लख्ख प्रकाश
देणारा 'मोती'आला का हाती?मैत्री....
एक बिंदु आणि अनेक मिळालेले सेतु
पार पाडावा अगदी जणु सराव रोजचा

मैत्री....
एक बगीचा मनात सदैव फ़ुलणारा
माळी होऊन घ्यावी जीवापाड काळजी

मैत्री....
एक धागा सरळ रेशमी मऊसुत जसा
जास्त ताणला तर तुटतो बघा ना कसा

मैत्री....
एक रोपटे अबोलीचे
प्रत्येकाच्या दारातले
फ़ुले मुक हसती पाणी पिताना ओन्जळीत

No comments: