दोघांच्याही मनात लपलेलं
भावनांचं एक गाव आहे
आणि भावनांच्या त्या गावाला
मैत्री असं नाव आहे...!!!
तू साथ दिल्यावर मला
मैत्रीचं नातं कळलं
म्हणूनच तुझ्याशी माझं
मग छान जमलं...!!!
देण्या-घेण्याची बेरीज
मैत्रीमध्ये शून्य आहे
मैत्रीची ही गणिताची रीत
म्हणूनच मला मान्य आहे...!!!
बंध तुझे माझे
असेच जुळून राहू देत
तुझे डोळे माझ्या नयनी
मैत्री सतत पाहु देत...!!!
आपल्या मैत्रीचा बंध हा
तुझ्या-माझ्यातील दुवा आहे
आणि मनापासून हा दुवा
दोघांनाही हवा आहे...!!!
मैत्री म्हणजे थोडं घेणं
मैत्री म्हणजे खूप देणं
मैत्री म्हणजे देता देता
समोरच्याचं होऊन जाणं...!!!
Friday, July 11, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment