दोन मनांची अशी असावी मैत्री
सुखात अन दु:खात टिकावी मैत्री...
दोघांपाशी काही उरले नाही;
दोघांमध्ये तरी उरावी मैत्री...
भेटगाठ घडते अथवा ना घडते
न भेटताही मनी जपावी मैत्री...
चढ-उतार असतातच नात्यांमध्ये
कठिण प्रसंगांतच दृढ व्हावी मैत्री...
'उपकारां'ची भाषा मैत्रीमध्ये?
द्यायचेच तर फक्त स्मरावी मैत्री...
जगायचे या जगात कोणासाठी?
जगायचे तर फक्त "आपल्या" मैत्रिसाठी...,,,,,,,,
Friday, July 11, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment