तुझी मैत्री आली माज्या आयुष्यात अशी ......
जणू काळ्याकुट्ट रात्रीनंतर
यावी एखादी प्रसन्न सकाळ,
जसा अमावास्येच्या अंधारानंतर
पसरावा चांदण्यांचा शीतल प्रकाश.
तुझी मैत्री आली माज्या आयुष्यात अशी ......
जशी रखरखीत उन्हामध्ये
यावी रिमझिम पावसाची सर,
जशी उदास अंतरी
उठावी एक आनंदाची लहर.
तुझी मैत्री आली माज्या आयुष्यात अशी ......
जसे अंधारलेले मन
लाखो दिव्यांनी जावे झगमगून
जसा भरून आलेल्या आभाळातही
हळूच चंद्र दिसावा ढगांच्या आडून.
तुझी मैत्री आली माज्या आयुष्यात अशी ......
जसे संथ पाण्यामध्ये
उठावे हजारो तरंग,
जशी निराश झालेल्या मनी
जागून यावी जगण्याची उमंग....!
Friday, July 11, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment