उदात्त मैत्रीचे एकच मागणे....!!!!!
चांदणे पांघरलेले आकाश नाही मागत तुझ्याकडे
क्षितिजावर लुकलुकणारा एक तारा मात्र आठवनीने दे
बेभान कोसळणारा मुक्त पाउस नाही मागत तुझ्याकडे
श्वासात दरवळणारा ओल्या मातीचा सुवास मात्र आठवनीने दे
बेधुंद करणार्या रातराणीचा बहर नाही मागत तुझ्याकडे
जाताना एक मोगर्याची कळी मात्र आठवनीने दे
उसळणारा बेछुट दर्या नाही मागत तुझ्याकडे
शांत जलाशयातील एक तरंग मात्र आठवनीने दे
मुठी एवढे ह्रुदय नाही मागत तुझ्याकडे
मझ्यासाठी चुकलेला एक ठोका मात्र आठवनीने दे
जिवनातल्या आनंदाचा एकही क्षण नाही मागत तुझ्याकडे
आयुष्यातल्या दु:खाचे पहिल्या पासून शेवटचे पळ मात्र आठवनीने दे
आठवनीने दे........
उदात्त मैत्रीचे एकच मागणे....!!!!!
Friday, July 11, 2008
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment